नमस्कार,
सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण CSRF Form कोषागार कार्यालयात जमा करण्याची पद्धतीची माहिती मिळवून घेतली होती. या सदरात आपण PRAN Kit बाबत माहिती मिळवून घेणार आहोत.
प्राण-किट (PRAN Kit) म्हणजे काय ?
सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण CSRF Form कोषागार कार्यालयात जमा करण्याची पद्धतीची माहिती मिळवून घेतली होती. या सदरात आपण PRAN Kit बाबत माहिती मिळवून घेणार आहोत.
CSRF Form कोषागार कार्यालयात यशस्वीरित्या जमा केल्यानंतर कर्मचा-यास PRAN Kit प्राप्त होते. ज्याप्रमाणे बैंकेत खाते सुरू केल्या नंतर बैंकेमार्फत आपल्याला स्टार्टअप किट प्राप्त होते, त्याचप्रमाणे NPS खाते सुरू केल्यानंतर NSDL कार्यालयामार्फत कर्मचा-यास प्राण किट प्राप्त होते. प्राण किट मध्ये आपणांस प्राण-कार्ड व Login पासवर्ड लिफाफा तसेच NSDL Subscriber Login माहितीपुस्तीका इत्यादी प्राप्त होते.
प्राण-कार्ड म्हणजे काय ?
कर्मचा-यास NSDL कार्यालयामार्फत ज्याप्रमाणे PAN Card सारखे दिसणारे स्मार्ट-कार्ड उपलब्ध होते. सदर कार्डवर कर्मचा-यास 12 अंकी प्राण क्रमांक उपलब्ध असतो. हा प्राण क्रमांक म्हणजे सबस्क्रायबरचा Permanent Retirement Account Number (PRAN) असतो. सदर प्राण क्रमांक CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login करण्यासाठी वापरला जातो.
प्राण-किट प्राप्त झाल्यानंतर लगेचच कर्मचा-याने CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login करणे आवश्यक आहे. अन्यथा प्राण-किट मध्ये प्राप्त झालेला Login पासवर्डचा उपयोग होणार नाही.
दुय्यम प्राण किट - Duplicate PRAN Kit
आपण खालील नमुद कारण स्पष्ट करून दुय्यम प्राण कीट साठी कोषागार कार्यालयात अर्ज करू शकता.
1) प्राण-किट हरवल्यास
2) वैयक्तिक माहितीत बदल -उदा.-आपले नाव, वडीलांचे नाव/पतिचे नाव ,जन्म तारिख, स्वाक्षरी, फोटो, इत्यादी मध्ये बदल झाल्यास.
सदर अर्जा सोबत 50 रुपये चलनाची छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
दुय्यम प्राण किट - Duplicate PRAN Kit
1) प्राण-किट हरवल्यास
2) वैयक्तिक माहितीत बदल -उदा.-आपले नाव, वडीलांचे नाव/पतिचे नाव ,जन्म तारिख, स्वाक्षरी, फोटो, इत्यादी मध्ये बदल झाल्यास.
सदर अर्जा सोबत 50 रुपये चलनाची छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
Trace Your PRAN Card (PRAN Kit Status)
CSRF Form भरल्यानंतर आपणांस किंवा आपल्या कार्यालयास केवळ आपला प्राण क्रमांक प्राप्त झाला आहे, मात्र प्राण-किट प्राप्त झाले नसल्यास प्राण-किट स्टेटस तपासून घ्यावे.
CRA-NSDL च्या मदतीने आपण आपले प्राण किट स्टेटस जाणून घेऊ शकता त्याकरिता आपला 12 अंकी प्राण क्रमांक आपणाकडे उपलब्ध आवश्यक आहे. (आपण सदर प्राण क्रमांक आपल्या कार्यालयाकडून अथवा कोषागार कार्यालयामार्फत मिळवू शकता.)
प्राण-किटची सध्याची स्थिती (PRAN Kit Status) जाणून घेण्यासाठी → येथे क्लिक करावे ←
for Office Click Here
प्राणकार्ड प्राप्त झाल्यानंतर CRA-NSDL प्रणालीवर कशा पद्धतीने Subscriber Login करता येईल त्याबाबतची माहिती आपण पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे. कृपया पुढील Blog पहावा.
missing credit in dcps बद्दलही काही तरी सांगावे
ReplyDelete