नमस्कार,
आपल्या वैयक्तीक माहितीत बदल केल्यानंतर जर आपल्या प्राण कार्ड मध्ये बदल होत असल्यास दुय्यम प्राण किट प्राप्त करावयाची माहिती जाणून घेण्यासाठी →येथे क्लिक करावे←
धन्यवाद..
सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. या सदरात आपण S-2/S-7 Form विषयी माहिती मिळवून घेणार आहोत.
S-2 Form- आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास कर्मचा-यास S-2 Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
आपणांस S-2 Form सेवार्थ प्रणालीद्वारे उपलब्ध होईल. त्यासाठी आपल्या वेतन शाखेत/DCPS शाखेत माहितीत बदल करण्याबाबत अर्ज करून आपण S-2 Form प्राप्त करून घेऊ शकता. त्यानंतर सदर S-2 Form वर आहरण व संवितरण अधिका-यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन सदर S-2 Form कोषागार कार्यालयात सादर करावा.
कोषागार कार्यालयात सादर केल्यानंतर एका आठवड्यानंतर आपले NPS Login करून Personal Details Tab मधील आपली वैयक्तीक माहिती वैधरित्या दुरूस्त झाली असल्याची खात्री करून घ्यावी.
S-7 Form- आपल्या स्वाक्षरीत अथवा छायाचित्रात बदल करावयाचा असल्यास S-7 Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
सदर S-7 Form वर आपला 3.5 X 2.5 आकाराचा फोटो चिकटवून त्याखाली स्वाक्षरी करून आहरण व संवितरण अधिका-यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन सदर S-7 Form कोषागार कार्यालयात सादर करावा.
कोषागार कार्यालयात S-7 Form सादर केल्यानंतर एका आठवड्यानंतर आपले NPS Login करून E-PRAN तपासून घ्यावे व दुरूस्त करण्यास दिलेली माहिती वैधरित्या दुरूस्त झाली असल्याची खात्री करून घ्यावी.
आपल्या वैयक्तीक माहितीत बदल केल्यानंतर जर आपल्या प्राण कार्ड मध्ये बदल होत असल्यास दुय्यम प्राण किट प्राप्त करावयाची माहिती जाणून घेण्यासाठी →येथे क्लिक करावे←
National Pension Scheme (NPS) is a contribution retirement scheme launched by Indian Government and regulated by Pension Fund Regulatory and Development Authority. Subscribers are also allocated two accounts can be opened under National Pension Scheme [NPS]
ReplyDelete