नमस्कार,
सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण प्राण-किट व प्राण-कार्ड स्टेटस बाबत माहिती जाणून घेतली. या सदरात आपण CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login कशा प्रकारे करावे, याची माहिती जाणून घेऊयात.
CRA-NSDL प्रणालीवर सर्व DCPS अधिकारी/कर्मचा-यांना Subscribers असे संबोधले जाते. आपणांस प्राण-किट प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर CRA-NSDL प्रणालीवर जाऊन "Subscriber Log-In" करणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे आपण वेतन चिट्ठी किंवा DCPS R-3 विवरणपत्र काढण्यासाठी आपण सेवार्थ प्रणालीवर Login करता त्याचप्रमाणे, एनपीएस विवरणपत्र (NPS Statement) काढण्यासाठी CRA-NSDL प्रणालीवर Login करावे.

पुढील सुचनांचे पालन करून खाली दिलेल्या वेबसाइट वर Login करावे.
1) सर्वप्रथम संगणकाच्या स्क्रीनवरील डाव्या बाजूला असणा-या SUBSCRIBERS Log-In या BOX मध्ये युजर-आयडी व पासवर्ड एंटर करणे.
2) आपला युजर आयडी कसा ओळखावा - आपल्या प्राणकार्डवरील 12 अंकी प्राणक्रमांक हा आपला Subscriber Log-In युजर-आयडी आहे.
3) आपला पासवर्ड कसा ओळखावा - आपल्या प्राणकीटमध्ये आलेल्या पासवर्डच्या लिफाफ्यात आपणांस दोन वेगवेगळे पासवर्ड उपलब्ध होतील, त्यापैकी सहा अंकी I-Pin हा आपला Subscriber Log-In पासवर्ड आहे.
4) Subscriber Log-In केल्यानंतर आपणांस नविन पासवर्ड तयार करण्यासाठी स्क्रीन ओपन होईल, आपल्या सोईनुसार आठ अंकी अल्फा न्युमरीक पासवर्ड (म्हणजे ज्यामध्ये अंक व अक्षरे व चिन्हे असतील असा पासवर्ड) सेट करावा व पुन्हा नव्याने Log-In करावे.
5) वरील प्रमाणे नव्याने Log-In केल्यानंतर आपली Subscriber Log-In Screen सुरू होईल.
Subscriber Login करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करावे.
----------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment