नमस्कार,
सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे.
सदर Blog सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे, राज्य शासकीय सेवेत रुजू होणा-या अधिकारी/कर्मचा-यांसाठी राज्य शासनामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची (NPS-National Pension Scheme) ओळख होणे हे आहे. तसेच NPS कार्यपद्दतीमध्ये सुलभता आणण्यासाठी सदर Blog उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो.
दि. 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासकीय सेवेत रुजू होणा-या अधिकारी/कर्मचा-यांसाठी शासनामार्फत राज्यात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS-Defined Contribution Pension Scheme) लागू करण्यात आली.
राज्य शासनाने केंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (NPS-National Pension Scheme) विलीन करण्याचा निर्णय घेतला. (कृपया दि. 06/04/2015 रोजीचा वित्त विभागाचा शासन निर्णय वाचावा. Click Here for GR)
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यालयीन कार्यप्रणाली कार्यरत आहे
PFRDA ↔ NPS Trust ↔ केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA)
↕
राज्य अभिलेख देखभाल अभिकरण (SRKA) ↔ NSDL Office, Mumbai
↕
जिल्हा कोषागार कार्यालय (DTO/PAO)
↕
आहरण व संवितरण अधिकारी (DDO-वेतन शाखा)
↕
अधिकारी/कर्मचारी (Subscriber)
NPS Registration करावयाची कार्यवाही पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे, कृपया पुढील Blog पहावा.
धन्यवाद…
No comments:
Post a Comment