Tuesday, 22 August 2017

2) CSRF Form & ISS Form

नमस्कार,

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. या सदरात आपण NPS Registration बाबत माहिती मिळवून घेणा आहोत.

एनपीएस योजनेत सहभागी होण्यासाठी करावयाची कार्यवाही पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिली कार्यवाही म्हणजे आपल्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन/रोख/DCPS शाखेमार्फत आपला CSRF Form जिल्हा कोषागार कार्यालयास (DTO/PAO) कार्यालयास नोंद घेण्यासाठी पाठविणे.

आपल्याला प्रश्न असेल CSRF Form म्हणजे काय ?


CSRF Form म्हणजे Common Subscriber Registration Form, CSRF Form आपल्या कार्यालयामार्फत सेवार्थ प्रणाली वरून काढता येतो.  एकूण 8 पाने असणारा हा अर्ज Printed Format मध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे सदर अर्जावर कोणतीही माहिती भरावी लागत नाही. (केवळ PAN Card व AADHAR CARD क्रमांक काळ्या शाईच्या पेनाने हाताने भरावा).

CSRF Form जमा करण्याबाबत कर्मचा-याची जबाबदारी -


कर्मचा-याने प्रिंट झालेली माहीती बरोबर असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. चुकीची माहिती प्रिंट झालेला CSRF Form जर कोषागार कार्यालयास जमा केला गेला तर एनएसडीएल कार्यालयाकडे चुकीची माहिती फिड होते व पुढे अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.


सदर CSRF Form वर कर्मचा-याने Signature Box मध्ये काळ्या शाईच्या पेनाने केवळ एकच स्वाक्षरी करावी. व 3.5 सेमी X 2.5 सेमी इतक्या आकाराचाच फोटो चिकटवणे आवश्यक आहे तसेच फोटोवर अथवा फोटो खाली स्वाक्षरी करून नये, अन्यथा प्राणकीट मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

CSRF Form जमा करण्याबाबत आहरण व संवितरण अधिका-यांची/कार्यालयाची जबाबदारी-



आहरण व संवितरण अधिका-यांनी आपली स्वाक्षरी व शिक्का तसेच पदाची माहिती CSRF Form वर भरून सदर CSRF Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.CSRF Form कोषागार कार्यालयात जमा केल्यानंतर कर्मचा-यास एक ते दीड महिन्यात प्राणकिट प्राप्त होते. 
प्राणकिट बाबतची माहिती आपण पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे. कृपया पुढील Blog पहावा.


Inter Sector Shfting Form (ISS Form)

जर आपणांस महाराष्ट्र शासन/केंद्र शासन सेवेत अथवा बैंकींग सेवेत कार्यरत असताना एनपीएस योजने अंतर्गत प्राण क्रमांक प्राप्त झाला असेल तर आपणांस पुन्हा एनपीएस योजनेअंतर्गत CSRF Form भरण्याची आवश्यकता नाही. आपली राज्य शासकीय सेवेत नियुक्ती होण्यापूर्वीच आपणांस प्राण क्रमांक प्राप्त असल्यास जर आपण पुन्हा CSRF Form भरून दिला तर दुबार प्राण क्रमांक होण्याची शक्यता असल्याने पुन्हा CSRF Form जमा करू नये

आपण आपला पूर्वीचा प्राण क्रमांक सध्याच्या शासन सेवेत रुजू होताना जोडून घेऊ शकता. यालाच प्राण क्रमांक पोर्टींग असे म्हणतात, ज्याप्रमाणे आपण आपला मोबाईल क्रमांक न बदलता एका ग्राहक सेवेतून दुस-या ग्राहक सेवेकडे Mobile Number Porting करता त्याचप्रमाणे आपण आपला जुना प्राण क्रमांक नव्या सेवेत रूजू होताना Porting करणे यालाच Inter Sector Shfting असे संबोधतात.

याकरीता आपण एसडीएल संकेतस्थळावर उपलब्ध असणा-या Inter Sector Shfting Form योग्यरित्या भरून जिल्हा कोषागार (DTO/PAO) कार्यालयाकडे जमा करावा त्यासोबत आपल्या चालू बैंक खात्याच्या कॅन्सल केलेल्या धनादेशाची प्रत जोडावी.  
ISS Form मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे आपण आपला जुना प्राण क्रमांक चालू ठेवू शकता व दुबार प्राण क्रमांक होण्याचा धोका टाळता येईल. 

No comments:

Post a Comment