Tuesday, 22 August 2017

6) S-2 & S-7 Form (Personal Detail Updation)

नमस्कार,


       सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. या सदरात आपण S-2/S-7 Form विषयी माहिती मिळवून घेणार आहोत.

S-2 Form- आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये कोणताही बदल झाल्यास कर्मचा-यास S-2 Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. 
    आपणांस S-2 Form सेवार्थ प्रणालीद्वारे उपलब्ध होईल. त्यासाठी आपल्या वेतन शाखेत/DCPS शाखेत माहितीत बदल करण्याबाबत अर्ज करून आपण S-2 Form प्राप्त करून घेऊ शकता. त्यानंतर सदर S-2 Form वर आहरण व संवितरण अधिका-यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन सदर S-2 Form कोषागार कार्यालयात सादर करावा. 

कोषागार कार्यालयात सादर केल्यानंतर एका आठवड्यानंतर आपले NPS Login करून Personal Details Tab मधील आपली वैयक्तीक माहिती वैधरित्या दुरूस्त झाली असल्याची खात्री करून घ्यावी. 

S-7 Form- आपल्या स्वाक्षरीत अथवा छायाचित्रात बदल करावयाचा असल्यास S-7 Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. 


S-7 Form मिळविण्याकरीता येथे क्लिक करावे← 

सदर S-7 Form वर आपला 3.5 X 2.5 आकाराचा फोटो चिकटवून त्याखाली स्वाक्षरी करून आहरण व संवितरण अधिका-यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन सदर S-7 Form कोषागार कार्यालयात सादर करावा. 


कोषागार कार्यालयात S-7 Form सादर केल्यानंतर एका आठवड्यानंतर आपले NPS Login करून E-PRAN तपासून घ्यावे व दुरूस्त करण्यास दिलेली माहिती वैधरित्या दुरूस्त झाली असल्याची खात्री करून घ्यावी.

आपल्या वैयक्तीक माहितीत बदल केल्यानंतर जर आपल्या प्राण कार्ड मध्ये बदल होत असल्यास दुय्यम प्राण किट प्राप्त करावयाची माहिती जाणून घेण्यासाठी →येथे क्लिक करावे←



धन्यवाद..

5) पासवर्ड रिसेट-Password Reset

नमस्कार,

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण cra-nsdl प्रणालीवर Log in करण्याची माहिती मिळवून घेतली होती. या सदरात आपण “Password Reset” करण्याबाबत माहिती मिळवून घेणार आहोत.

cra-nsdl प्रणालीमध्ये Login करण्यासाठी आपल्याकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे मात्र जर आपण पासवर्ड विसरलात अथवा जर आपण सलग 5 वेळा चुकीचा पासवर्ड एंटर केलात अथवा सहा महिन्यापर्यंत आपण Subscriber Login न केल्याने आपला पासवर्ड Expire झाल्यास आपण पासवर्ड रिसेट करण्याची प्रक्रिया करून Subscriber Login करू शकता.


पासवर्ड रिसेट करण्याची पद्धती आपण पुढील स्क्रिन वर क्लिक करून पाहू शकता

Step 1 - Forgot Password


Step 2 - PRAN Number Feeding 


Step 3 - Personal Information Feeding


Step 4 - Information Confirm Screen



Step 5 - Acknowledgement Slip Print 

4) नोंदणी - CRA-NSDL Login


नमस्कार,

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण प्राण-किट व प्राण-कार्ड स्टेटस बाबत माहिती जाणून घेतली. या सदरात आपण CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login कशा प्रकारे करावे, याची माहिती जाणून घेऊयात.

CRA-NSDL प्रणालीवर सर्व DCPS अधिकारी/कर्मचा-यांना Subscribers असे संबोधले जाते. आपणांस प्राण-किट प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर CRA-NSDL प्रणालीवर जाऊन "Subscriber Log-In" करणे आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे आपण वेतन चिट्ठी किंवा DCPS R-3 विवरणपत्र काढण्यासाठी आपण सेवार्थ प्रणालीवर Login करता त्याचप्रमाणे, एनपीएस विवरणपत्र (NPS Statement) काढण्यासाठी CRA-NSDL प्रणालीवर Login करावे.


पुढील सुचनांचे पालन करून खाली दिलेल्या वेबसाइट वर Login करावे.


1) सर्वप्रथम संगणकाच्या स्क्रीनवरील डाव्या बाजूला असणा-या SUBSCRIBERS Log-In या BOX मध्ये युजर-आयडी व पासवर्ड एंटर करणे.

2) आपला युजर आयडी कसा ओळखावा - आपल्या प्राणकार्डवरील 12 अंकी प्राणक्रमांक हा आपला Subscriber Log-In युजर-आयडी आहे.

3) आपला पासवर्ड कसा ओळखावा - आपल्या प्राणकीटमध्ये आलेल्या पासवर्डच्या लिफाफ्यात आपणांस दोन वेगवेगळे पासवर्ड उपलब्ध होतील, त्यापैकी सहा अंकी I-Pin हा आपला Subscriber Log-In पासवर्ड आहे.

4) Subscriber Log-In केल्यानंतर आपणांस नविन पासवर्ड तयार करण्यासाठी स्क्रीन ओपन होईल, आपल्या सोईनुसार आठ अंकी अल्फा न्युमरीक पासवर्ड (म्हणजे ज्यामध्ये अंक व अक्षरे व चिन्हे असतील असा पासवर्ड) सेट करावा व पुन्हा नव्याने Log-In करावे.

5) वरील प्रमाणे नव्याने Log-In केल्यानंतर आपली Subscriber Log-In Screen सुरू होईल.

Subscriber Login करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करावे.
----------------------------------------------------------------------


Login Home Screen







                                                                                                                                                      

विविध टॅबची माहिती आपण पुढील स्क्रिन वर क्लिक करून पाहू शकता.

1) Transaction Tab :












2) Security Tab :












3) Account Details Tab :












4) Grievance Tab :












5) Transaction Statement :












6) Exit and Withdrawal :












7) Views :

3) प्राण-कीट - PRAN Kit

नमस्कार,

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण CSRF Form कोषागार कार्यालयात जमा करण्याची पद्धतीची माहिती मिळवून घेतली होती. या सदरात आपण PRAN Kit बाबत माहिती मिळवून घेणार आहोत.

प्राण-किट (PRAN Kit) म्हणजे काय ?
CSRF Form कोषागार कार्यालयात यशस्वीरित्या जमा केल्यानंतर कर्मचा-यास PRAN Kit प्राप्त होते. ज्याप्रमाणे बैंकेत खाते सुरू केल्या नंतर बैंकेमार्फत आपल्याला स्टार्टअप किट प्राप्त होते, त्याचप्रमाणे NPS खाते सुरू केल्यानंतर NSDL कार्यालयामार्फत कर्मचा-यास प्राण किट प्राप्त होते. प्राण किट मध्ये आपणांस प्राण-कार्ड व Login पासवर्ड लिफाफा तसेच NSDL Subscriber Login माहितीपुस्तीका इत्यादी प्राप्त होते. 



प्राण-कार्ड म्हणजे काय ? 

कर्मचा-यास NSDL कार्यालयामार्फत ज्याप्रमाणे PAN Card सारखे दिसणारे स्मार्ट-कार्ड उपलब्ध होते. सदर कार्डवर कर्मचा-यास 12 अंकी प्राण क्रमांक उपलब्ध असतो. हा प्राण क्रमांक म्हणजे सबस्क्रायबरचा Permanent Retirement Account Number (PRAN) असतो. सदर प्राण क्रमांक CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login करण्यासाठी वापरला जातो. 

प्राण-किट प्राप्त झाल्यानंतर लगेचच कर्मचा-याने CRA-NSDL प्रणालीवर Subscriber Login करणे आवश्यक आहे. अन्यथा प्राण-किट मध्ये प्राप्त झालेला Login पासवर्डचा उपयोग होणार नाही.

दुय्यम प्राण किट - Duplicate PRAN Kit
आपण खालील नमुद कारण स्पष्ट करून दुय्यम प्राण कीट साठी कोषागार कार्यालयात अर्ज करू शकता.
1) प्राण-किट हरवल्यास
2) वैयक्तिक माहितीत बदल -उदा.-आपले नाव, वडीलांचे नाव/पतिचे नाव ,जन्म तारिख, स्वाक्षरी, फोटो, इत्यादी मध्ये बदल झाल्यास.
सदर अर्जा सोबत 50 रुपये चलनाची छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

Trace Your PRAN Card (PRAN Kit Status) 

CSRF Form भरल्यानंतर आपणांस किंवा आपल्या कार्यालयास केवळ आपला प्राण क्रमांक प्राप्त झाला आहे, मात्र प्राण-किट प्राप्त झाले नसल्यास प्राण-किट स्टेटस तपासून घ्यावे. 

CRA-NSDL च्या मदतीने आपण आपले प्राण किट स्टेटस जाणून घेऊ शकता त्याकरिता आपला 12 अंकी प्राण क्रमांक आपणाकडे उपलब्ध आवश्यक आहे. (आपण सदर प्राण क्रमांक आपल्या कार्यालयाकडून अथवा कोषागार कार्यालयामार्फत मिळवू शकता.)


प्राण-किटची सध्याची स्थिती (PRAN Kit Status) जाणून घेण्यासाठी  → येथे क्लिक करावे 
for Office Click Here 
प्राणकार्ड प्राप्त झाल्यानंतर CRA-NSDL प्रणालीवर कशा पद्धतीने Subscriber Login करता येईल त्याबाबतची माहिती आपण पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे. कृपया पुढील Blog पहावा.

2) CSRF Form & ISS Form

नमस्कार,

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. या सदरात आपण NPS Registration बाबत माहिती मिळवून घेणा आहोत.

एनपीएस योजनेत सहभागी होण्यासाठी करावयाची कार्यवाही पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिली कार्यवाही म्हणजे आपल्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने वेतन/रोख/DCPS शाखेमार्फत आपला CSRF Form जिल्हा कोषागार कार्यालयास (DTO/PAO) कार्यालयास नोंद घेण्यासाठी पाठविणे.

आपल्याला प्रश्न असेल CSRF Form म्हणजे काय ?


CSRF Form म्हणजे Common Subscriber Registration Form, CSRF Form आपल्या कार्यालयामार्फत सेवार्थ प्रणाली वरून काढता येतो.  एकूण 8 पाने असणारा हा अर्ज Printed Format मध्ये उपलब्ध होतो. त्यामुळे सदर अर्जावर कोणतीही माहिती भरावी लागत नाही. (केवळ PAN Card व AADHAR CARD क्रमांक काळ्या शाईच्या पेनाने हाताने भरावा).

CSRF Form जमा करण्याबाबत कर्मचा-याची जबाबदारी -


कर्मचा-याने प्रिंट झालेली माहीती बरोबर असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. चुकीची माहिती प्रिंट झालेला CSRF Form जर कोषागार कार्यालयास जमा केला गेला तर एनएसडीएल कार्यालयाकडे चुकीची माहिती फिड होते व पुढे अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.


सदर CSRF Form वर कर्मचा-याने Signature Box मध्ये काळ्या शाईच्या पेनाने केवळ एकच स्वाक्षरी करावी. व 3.5 सेमी X 2.5 सेमी इतक्या आकाराचाच फोटो चिकटवणे आवश्यक आहे तसेच फोटोवर अथवा फोटो खाली स्वाक्षरी करून नये, अन्यथा प्राणकीट मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

CSRF Form जमा करण्याबाबत आहरण व संवितरण अधिका-यांची/कार्यालयाची जबाबदारी-



आहरण व संवितरण अधिका-यांनी आपली स्वाक्षरी व शिक्का तसेच पदाची माहिती CSRF Form वर भरून सदर CSRF Form कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.CSRF Form कोषागार कार्यालयात जमा केल्यानंतर कर्मचा-यास एक ते दीड महिन्यात प्राणकिट प्राप्त होते. 
प्राणकिट बाबतची माहिती आपण पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे. कृपया पुढील Blog पहावा.


Inter Sector Shfting Form (ISS Form)

जर आपणांस महाराष्ट्र शासन/केंद्र शासन सेवेत अथवा बैंकींग सेवेत कार्यरत असताना एनपीएस योजने अंतर्गत प्राण क्रमांक प्राप्त झाला असेल तर आपणांस पुन्हा एनपीएस योजनेअंतर्गत CSRF Form भरण्याची आवश्यकता नाही. आपली राज्य शासकीय सेवेत नियुक्ती होण्यापूर्वीच आपणांस प्राण क्रमांक प्राप्त असल्यास जर आपण पुन्हा CSRF Form भरून दिला तर दुबार प्राण क्रमांक होण्याची शक्यता असल्याने पुन्हा CSRF Form जमा करू नये

आपण आपला पूर्वीचा प्राण क्रमांक सध्याच्या शासन सेवेत रुजू होताना जोडून घेऊ शकता. यालाच प्राण क्रमांक पोर्टींग असे म्हणतात, ज्याप्रमाणे आपण आपला मोबाईल क्रमांक न बदलता एका ग्राहक सेवेतून दुस-या ग्राहक सेवेकडे Mobile Number Porting करता त्याचप्रमाणे आपण आपला जुना प्राण क्रमांक नव्या सेवेत रूजू होताना Porting करणे यालाच Inter Sector Shfting असे संबोधतात.

याकरीता आपण एसडीएल संकेतस्थळावर उपलब्ध असणा-या Inter Sector Shfting Form योग्यरित्या भरून जिल्हा कोषागार (DTO/PAO) कार्यालयाकडे जमा करावा त्यासोबत आपल्या चालू बैंक खात्याच्या कॅन्सल केलेल्या धनादेशाची प्रत जोडावी.  
ISS Form मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे आपण आपला जुना प्राण क्रमांक चालू ठेवू शकता व दुबार प्राण क्रमांक होण्याचा धोका टाळता येईल. 

1) एनपीएस योजनेची माहिती


नमस्कार,


सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. 

सदर Blog सुरू करण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे, राज्य शासकीय सेवेत रुजू होणा-या अधिकारी/कर्मचा-यांसाठी राज्य शासनामार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची (NPS-National Pension Scheme) ओळख होणे हे आहे. तसेच NPS कार्यपद्दतीमध्ये सुलभता आणण्यासाठी सदर Blog उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो.

दि. 01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासकीय सेवेत रुजू होणा-या अधिकारी/कर्मचा-यांसाठी शासनामार्फत राज्यात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS-Defined Contribution Pension Scheme) लागू करण्यात आली. 
 राज्य शासनाने केंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (NPS-National Pension Scheme) विलीन करण्याचा निर्णय घेतला. (कृपया दि. 06/04/2015 रोजीचा वित्त विभागाचा शासन निर्णय वाचावा. Click Here for GR)

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या (NPS) अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यालयीन कार्यप्रणाली कार्यरत आहे

PFRDA      NPS Trust      केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA)


राज्य अभिलेख देखभाल अभिकरण (SRKA)      NSDL Office, Mumbai 


जिल्हा कोषागार कार्यालय (DTO/PAO)


आहरण व संवितरण अधिकारी (DDO-वेतन शाखा)


अधिकारी/कर्मचारी (Subscriber)


NPS Registration करावयाची कार्यवाही पुढील Blog मध्ये उपलब्ध आहे, कृपया पुढील Blog पहावा.



धन्यवाद…